नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या आणि एन.ए परीक्षार्थींसाठी कोल्हापूरातून विशेष गाडीची सोय़ : असे आहे वेळापत्रक

indian railway to run special train for NDA and NA examination Rajarshi Shahu Maharaj Terminus for Nagpur
indian railway to run special train for NDA and NA examination Rajarshi Shahu Maharaj Terminus for Nagpur
Updated on

 कोल्हापूर : नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या (एनडीए) आणि एन.ए परीक्षेसाठी येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनस मधून सकाळी आठ वाजता नागपूरला विशेष रेल्वेगाडी रवाना झाली. कोल्हापुरातून सुटलेल्या 24 डब्ब्यांच्या रेल्वेगाडीत केवळ 74 विद्यार्थ्यांचा समावेश होता. केंद्र शासनाने केवळ विद्यार्थ्यांसाठीही ही गाडी सोडली आहे. सातारा, मिरजसह अन्य ठिकाणातील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. 


एनडीए आणि एन.ए. परीक्षेसाठी नागपूर, धारवाड आणि गोवा (मडगाव) या तीन ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पोचण्यासाठी केंद्र शासनाकडून थेट रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. "एनडीए परीक्षा विशेष गाडी' म्हणून या गाड्या सोडल्या जात आहेत. आज सकाळी सुटलेली गाडी उद्या (रविवारी) नागपुरात पोचणार आहे. तसेच रात्री आठ वाजता पुन्हा ही गाडी नागपुरातून कोल्हापूरकडे रवाना होणार असून सोमवारी ती येथे पोचणार आहे. 

दरम्यान आज (शनिवारी) सायंकाळी साडेसात वाजता गोव्याला(मडगाव) तर रात्री दहा वाजता धारवाडला सुद्धा अशी परीक्षा स्पेशल रेल्वेगाड्या रवाना होणार आहेत. आज दुपारी एकच्या सुमारास धारवाडसाठी 27 विद्यार्थ्यांनी तर गोव्यासाठी 17 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बुकींग केले होते.

कोरोना महामारीमुळे अनेकांना परीक्षास्थळी योग्य वेळेत पोचण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात हा प्रश्‍न पुढे आल्यानंतर परीक्षा स्पेशल रेल्वेचा निर्णय देशभरात घेण्यात आला. त्यातून आज कोल्हापुरातून विशेष रेल्वे पैकी एक रवाना झाली असून उर्वरित दोन सायंकाळी आणि रात्री रवाना होणार असल्याचे स्थानकावरून सांगण्यात आले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Dahi Handi Govinda death in Shirol
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Marathi News Esakal
www.esakal.com